Today’s Gold Silver Rate : आजपासून नवरात्रोत्सव सुरू झाला. सगळीकडे नवरात्रीची जय्यत तयारी सुरू आहे. बाजारात ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. नवरात्रोत्सवदरम्यान अनेक जण कपडे, दागिने खरेदी करतात. जर तुम्ही आज सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा सोने चांदीचा भाव जाणून घ्या.
सप्टेंबर महिन्यात सोने चांदीच्या दरात अनेकदा चढ उतार दिसून आली. महिन्याच्या अखेरीस सोन्याचे भाव गगनाला भिडले होते त्यामुळे नवरात्रोत्सव-दसरा दरम्यान सोने खरेदी करावे की नाही, असा प्रश्न ग्राहकांना पडला होता. पण आता ऐन नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण दिसून आली आहे पण चांदीचे दर वाढले आहे.
सोने खरेदी करताना हॉलमार्क का महत्त्वाचा?
हॉलमार्कचा उद्देश सोन्याची पारदर्शकता तपासणे होय. दागिन्यांमध्ये किती कॅरेट सोन्याचा समावेश आहे हे हॉलमार्कसह लिहिले जाते. या युनिक कोडद्वारे दागिने शोधणे सोपी होते.सोन्याची पारदर्शकता तपासणे आहे.१ एप्रिल २०२३ पासून, केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार हॉलमार्कशिवाय कोणतेही दागिने बाजारात विकता येत नाहीत.