या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 हजार रुपये
ऑक्टोबरमध्ये जमा होणार PM किसानचा 18 वा हप्ता
शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीला हातभार लावणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी आता 18 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. या योजनेंतर्गत, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे. या माध्यमातून शेतकरी त्यांच्या शेतीच्या गरजा पूर्ण करु शकतील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतील. आतापर्यंत सरकारने 17 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. 18वा हप्ताही पुढील महिन्यात जाहीर केला जाऊ शकतो.
या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 हजार रुपये
शेतकऱ्यांना ‘या’ नवीन सूचनांचे पालन करावे लागणार
या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 हजार रुपये
ई-केवायसीची प्रक्रिया खूप सोपी
ई-केवायसीची प्रक्रिया आता खूप सोपी झाली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने सुरू केलेल्या पीएम किसान मोबाइल ॲपमध्ये ‘फेस ऑथेंटिकेशन फीचर’ उपलब्ध आहे. या फीचरच्या मदतीने शेतकरी आता घरी बसून OTP किंवा फिंगरप्रिंटशिवाय चेहरा स्कॅन करून ई-केवायसी करू शकतात. विशेषतः दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी ही पद्धत अतिशय सोयीची आहे. याशिवाय, शेतकरी त्यांच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरला (CSCs) भेट देऊन बायोमेट्रिक केवायसी देखील मिळवू शकतात. जर शेतकरी स्वत: OTP द्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करत असेल, तर ते विनामूल्य आहे, जर त्याने कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन केवायसी केले तर त्याला काही शुल्क भरावे लागेल.